100 टक्के निकालाची परंपरा कायम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सी बी एस ई च्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील mit विश्वशांती गुरुकुल स्कुलचा निकाल 100 टक्के लागला आहे.
शैक्षणीक वर्ष २०१९-२० मध्ये झालेल्या १०वी च्या CBSE बोर्डाचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून या मध्ये एम.आई.टी विश्वशांती गुरुकुल स्कूल , वाखरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे .
२०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या सी.बी .एस.ई परीक्षेमध्ये १० वी साठी या शाळे मधून ४८ विद्यार्था बसलेले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी चांगल्या मार्कने उत्तीर्ण होऊन शाळेची सलग ११ वर्षाची १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या ४८विद्यार्थ्या पैकी 34 विद्यार्थानी ७०% व त्याहून अधिक गुण मिळऊन उत्तीर्ण झाले आहेत.
एम.आई .टी विश्वशांती गुरुकुल स्कूल , वाखरी ही संस्था संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या शैक्षणीक गुणवत्ते साठी प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे याही वर्षी या संस्थे मध्ये शिकत असणाऱ्या कु. गार्गी थिटे – ९५.८०%, चि. अभिषेक वाघमोडे- ९४.४% , चि. आदित्य डोभाडा- ९४.४% , कु. सिया गांधी – ९३.६% , कु. अनुष्का देशमुख – ९२.८%, चि. चैतन्य माने- ९२.८% व चि. प्रणव पाटील- ९१.४% गुण संपादन करून संस्थेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
या विद्यार्थाना यश संपादन करण्या साठी संस्थे मध्ये कार्यरत असणारे शिक्षक सौ. रुपाली गुर्जर , सौ. श्रीवल्ली कोगंती, श्री. जॉन्सन जॉय तसेच संस्थेचे उप-प्राचार्य श्री . सचिनकुमार शर्मा तसेच प्राचार्य श्री . शिवाजी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले . या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. विश्वनाथ.डी.कराड तसेच कार्यकारी संचालिका प्रो. सौ.स्वाती चाटे यांनी सर्व विद्यार्थी,पालक, व शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले व ही परंपरा कायम राखण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे प्राचार्य श्री . शिवाजी गवळी, उप-प्राचार्य श्री . सचिनकुमार शर्मा तसेच प्रशासकीय अधिकारी केदार भोकरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेछया दिल्या.