आ. भारतनाना साठी दामाजीवर शोकसभेचे आयोजन

1 डिसेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर आदरांजली वाहिली जाणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1 डिसेंबर रोजी श्री दामाजी सहकारी साखर कारखान्यावर शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल चे चेअरमन भारत नाना यांचे शुक्रवार (दि 28 रोजी ) दुःखद निधन झाले आहे. दामाजी सहकारी साखर कारखाण्याचे संचालक, सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूक कामगार यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवार दि १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर शोकसभेचे आयोजन केले आहे.

तरी तालुक्यातील निरनिराळया संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, सभासद, कारखान्याकडील सिझन कामाचे कंत्राटदार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कर्मचारी बंधु यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री समाधान आवताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!