111 युवकांनी केले रक्तदान
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्य पंढरीत रक्त दानशिबिर आयोजित केले होते. आ. रोहितदादा युवा मंचने आयोजित केलेल्या या शिबिरात 111 जनानी रक्तदान केले व चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी कार्यकमाचे उद्घाटन पंढरपुर- मंगळवेढाचे आमदार भारत भालके, दिपक आबा साळूंखे-पाटिल, मोहोळ अर्बन बॅंकेचे चेअरमन डॅा योगेश रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशअध्यक्ष राजू पाटील – बोंबले, जिल्हाअध्यक्ष योगेश देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले.
शिबीर संपन्नतेसाठी तालुकाध्यक्ष सुर्यकांत बागल , कार्याध्यक्ष- नवनाथ आसबे व योगेश होनमाने,प्रमोद गंगनमले, प्रविण खरात, बालाजी साळुंखे, ज्योतिर्लिंग फाटे,सागर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.