आ.रोहितदादा पवार युवा मंचच्या पंढरपूर कार्याध्यक्षपदी नवनाथ आसबे यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आ रोहितदादा पवार युवा मंचच्या पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी शेळवे ( ता. पंढरपूर ) येथील नवनाथ आसबे यांची निवड झाली आहे.
मंचाचे जिल्हाध्यक्ष योगेश भैय्या देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा, तसेच राज्यात नेतृत्व करत असणारे आ. रोहितदादा पवार यांच्या विचाराने राज्यभर सामाजिक कार्य व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन तळागाळातील सर्वसामान्यांचे हात बळकट करणार असल्याचे नवनाथ आसबे यांनी सांगितले.
आ. रोहितदादा पवार विचार मंच पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी नवनाथ आसबे यांच्या निवडीचे पत्र मंचचे जिल्हाध्यक्ष योगेश भैया देशमुख -पाटील, प्रदेश सचिव प्राध्यापक मच्छिंद्र गोरड, गणेश पवार, बाबासाहेब काळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!