कासेगांव परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांचे नुकसान


आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

सोलापूर : ईगल आय मीडिया

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव, वडजी परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, कांदा,तूर,उडीद,मूग व द्राक्ष बाग इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज (रविवारी) या परिसराचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांना, शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मंगळवारी रात्री आणि बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरामणी मंडलातील कासेगांव येथे 185 मि.मि. पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्यात गेले होते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कांदा, उडीद, मूग, तूर, द्राक्ष या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झालेेले पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. यावेेळी आ. कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी वाघमारे, तालुका विस्तार अधिकारी देसाई, बोरामणी मंडल अधिकारी धनुरे, कृषि सहाय्यक नागेश चंदेले, मदन माने-पाटील, गाव कामगार तलाठी सौ. इज्ज-पवार, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकर येणगुरे, बालाजी चौगुले यांच्यासह सरपंच सौ. सुरेखा काळे, उपसरपंच शंकर वाडकर, ग्रा.प.सदस्य राम अप्पा चौगुले, चंद्रकांत चव्हाण, निशिकांत पाटील, राम हुडकर, प्रविण चौगुले, मधुकर चिवरे, ज्ञानेश्वर कदम, गांव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, गुरु काटकर, बालाजी चौगुले, ओंकार येणगुरे, विलास सुरवसे,
केदार ढेकळे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!