आ.निकम यांनी यावेळी फाटे यांच्या पक्ष कार्याचे कौतुक केले.
प्रतिनिधी : पंढरपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे आ. शेखर निकम यांनी पंढरपूर येथे आल्यानंतर राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी निकम यांचे स्वागत करण्यात आले.
आ.निकम यांनी यावेळी फाटे यांच्या पक्ष कार्याचे कौतुक केले. पक्ष संघटन बांधणीसाठी त्यांनी केलेला उद्योग व व्यापार विभाग महाराष्ट्र दौरा , राज्यभरात युवक युवतींचे राज्यात पक्ष संघटनेचे केलेले मजबूत जाळे याविषयी कौतुक केले. विद्यमान आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी फाटे यांनी या काळात आपल्या अनुभवाचा फायदा संघटना वाढीसाठी निश्चित होणार असून ज्या पद्धतीने आपण संकट काळात संघटनेची नव्या पद्धतीने उत्तम बांधणी केली त्याच पद्धतीने काम करून महाराष्ट्रभर संघटना मजबूत करणार असल्याचे, आश्वासन निकम याना याप्रसंगी दिले .
याप्रसंगी सौ.प्रिया निकम, उद्योजक अभिजीत सुर्वे व उद्योजिका सौ. सई सुर्वे, गोरख बागल, रमेश फाटे , सतीश बागल , उमेश फाटे, औदुंबर माने उपस्थित होते .