पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर तहसील कार्यालयापासून ते टाकळी बायपास हा रस्ता पंढरपूर ला जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी एक आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तो धोकादायक बनला होता. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या रस्त्याचे रुंदीकरण रुंदीकरण, काँक्रीटकरणं करून घेतल्या बद्दल गादेगावचे डी बिल्डर यांच्या वतींन आ. प्रशांत परिचारक सत्कार करण्यात आला.
या मार्गावरून येणाऱ्या लोकांची यामुळे चांगली सोय झाली, याबद्दल चांगल्या कामाची जाण ठेवून वृक्षमित्र बिल्डर दत्ता बागल यांनी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सन्मान केला. यापुढेही आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून चांगली कामे होत राहतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
आमदार प्रशांतराव परिचारक यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन हा रस्ता मंजूर करुन आणला. चौपदरीकरण करुन या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले व रस्त्याच्या मधोमध दुभाजक करुन रुंदीकरण ही केले. हा रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा झाला असून यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. या मार्गावरून जाणारी प्रत्येक व्यक्ती यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांना धन्यवाद देत आहेत.
यावेळी बिल्डर दत्ता बागल, भाजपा तालुकाध्यक्ष भास्करदादा कसगावडे, प्रशांतराव परिचारक युवा मंच तालुकाध्यक्ष गणेश बागल, युवा नेते सुनिलकाका भोसले, पंचायत समिती सदस्य भैय्या देशमुख, भाजपा अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणतात्या धनवडे, पंडित शेंबडे, राजकुमार रेडे, संदीप कळसुले, भगवानराव रकटे आदी उपस्थित होते.