आ.प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस : नवशक्तीचे विक्रमी रक्तदान


पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांतराव परिचारक यांचा 56 वा वाढदिवस गणेश अधटरावयांच्या नवशक्ती सामाजिक संघटनेच्या 197 कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.


यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक यांनी जनतेसाठीच जीवन अर्पण असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पाऊलांवरच मार्गक्रमण करत भविष्याचे वेध घेऊन,वास्तवादी सामाजिक व विकासात्मक कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी सर्वांना आरोग्यविषयक दक्षता बाळगण्याचेही अवाहन केले.

करोना कालावधी पाहता नवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गणेश अधटराव व कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान शिबिरा बरोबरच देशी वृक्ष असलेले कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक उद्यान निर्मिती , डाॕ.मनोज भायगुडे यांचे सहकार्याने नेत्रचिकित्सा व मोफत चेष्मे वाटप शिबीर व वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी जेष्ठ नागरिक गोंजारीसर, पोरे,अंबोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्रशांत वाघमारे यांनी तर सुत्रसंचलन तेजस कलुबर्मे व आभार नागेश सुर्यवंशी यांनी मानले.यावेळी मोठ्या संखेने ईसबावी, सह्याद्रीनगर, शिवाजीनगर,काळोशी,उमानगर,शांकुतलनगर,वाल्मिकीनगर,वैष्णवनगर,शिक्षक सोसायटी,परमहंस सोसायटी,साबळेनगर,स्वामी विवेकानंदनगर परिसरातील नागरीक व तरुण उपस्थित होते.


रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमासाठी मा.नगरसेवक गणेश अधटराव, नगरसेवक विशाल मलपे,भाग्यश्री शिंदे,नागेश सुर्यवंशी,प्रकाश गुंड,सोमनाथ लोहकरे,सोमनाथ अधटराव,समीर शेख,कांता जाधव,उमेश जाधव, विकी अभंगराव,सचिन गळितकर,संजय गंगधरे,सचिन शिंदे,प्रकाश मगर,चांगदेव लवटे,निखिल सुर्यवंशी,सचिन कदम,समाधान लोखंडे,मंगेश वांगडे,सोपान सावंत,अशितोष सावंत, जेष्ठ नागरीक संघटना व नवशक्ती सामाजिक संघटना व विविध तरुण मंडळाच्या कार्यर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!