पंढरपूर : ईगल आय न्यूज
पटवर्धन कुरोली ( ता पंढरपूर ) येथील ज्येष्ठ नेते मोहन नामदेव उपासे ( वय 74 वर्षे ) यांचे रविवार ( दि.1 ऑकटोंबर ) रोजी ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने इंदूर ( मध्यप्रदेश ) जवळ निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी आ. स्व. औदुंबरअण्णा पाटील यांचे निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते.
इंग्रज राजवटीमध्ये शेतसरा न भरल्यामुळे अख्या गावाची जमीन जप्त करण्याची प्रक्रिया इंग्रज सरकारने सुरु केली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी नामदेव उपासे यांनी संपूर्ण गावाचा शेतसारा स्वतः भरला आणि ग्रामस्थांच्या जमिनी सोडवल्या होत्या. पूर्वजांच्या याच कार्याचे स्मरण म्हणून मोहन उपासे यांनीही सन 2021 रोजी स्वतः पूर्ण गावाचा शेतसारा भरला होता.
मागील आठवड्यापासून ते उत्तर भारतात तीर्थाटनास गेले होते. त्यादरम्यान इंदूर ( मध्यप्रदेश ) येथे एका मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर पायऱ्या चढल्यामुळं त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे मृत्यू झाला. मोहन उपासे यांच्या निधनामुळे पटवर्धन कुरोली परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.