युवाभिम सेनेचे युवराज सकट यांचा इशारा
मोहोळ : ईगल आय मीडिया
मोहोळ येथील सेतू कार्यालयात विद्यार्थी शेतकरी, नागरीकांची लूट केली जात आहे. त्यामुळे संबंधीतांची चौकशी करुन होणारी लुट तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा युवा भिम सेनेच्या वतीने सेतू कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष युवराज सकट यांनी दिला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, युवाभिम सेनेचे जिल्हा अध्यक्ष युवराज सकट त्यांच्या कामासाठी शुक्रवारी मोहोळच्या सेतू कार्यालयात गेले होते. तेथील कर्मचारी हे उत्पन्न दाखला, अॅफिडेव्हीट, जातीचा दाखला वेळेवर मिळत नसून त्या त्या कामासाठी शासनाने ठरवून दिलेल्या फी शिवाय जादा पैसे घेतले जातात असे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सेतू मॅनेजर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सकट यांनी मोहोळचे तहसिलदार जीवन बनसोडे यांना या होणाऱ्या लुटी बद्दल निवेदन दिले असून ही लुटमार तांत्काळ थांबवण्यात यावी व संबंधीतावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तसेच ही मागणी मान्य न झाल्यास युवा भिमसेना मोहोळ सेतू कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यावेळी राजाभाऊ अष्टूळ, अविनाश काळे, आजित कसबे, सुग्रीव व्हवाळे, भारत कसबे रोहित आवळे आदी उपस्थित होते.