प्रतिनिधी : पंढरपूर
गादेगाव ता.पंढरपूर येथील अनिकेत नंदकुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ( राजपत्रित )या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापार आणि उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी शिंदे यांचा सत्कार केला.
गादेगाव सारख्या ग्रामीण भागातून कुठलाही क्लास न लावता ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले त्याबद्दल त्यांच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे, त्यांच्यापासून इतर युवकांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा फाटे यांनी यावेळी व्यक्त केली.
अनिकेत यांचे वडील नंदकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना, अनिकेत हा व्हाट्सअप, फेसबूक काहीही वापरत नव्हता. घरात टीव्ही नाही, सोशल मीडिया पासून दूर राहिल्यामुळे मुले चांगलं यश संपादन करू शकतात. हाआदर्श समाजातील इतर तरुणांनी घ्यावा असे अवाहन केले .
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत मोरे, सलीम सय्यद नूर काझी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, सतीश बागल , विनय शिंदे, विकास घाडगे, सोमनाथ सातपुते उपस्थित होते .