पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या अनुपसिंह यादव आणि करकम्ब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झालेल्या सौ. गीता टकले यांचा संभाजी ब्रिगेड पंढरपूरच्या वतीने सत्कार करून सन्मानित करण्यात आले,
दोनच दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील अनुपसिंह यादव आणि गीतांजली टकले यांनी यश मिळवले. त्याबद्दल दोन्ही गुणवंतांचा सत्कार येथील राजमाता जिजाऊ स्मारकाच्या आवारात आयोजित केला होता.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे, स्वागत कदम, ऍड.सागर आटकळे, स्वप्निल गायकवाड, आकाश पवार, शहाजी शिंदे, किशोर मोळक, निलेश गंगथडे, अनिल यादव, रणजित आटकळे,इ मान्यवर उपस्थित होते.