एमएस-सीआयटी परीक्षा : सख्या बहिणी महाराष्ट्रात प्रथम

आय आय टी कॉम्प्युटर च्या विद्यार्थिनींचे यश

पंढरपूर : ईगल आय मिडिया

पंढरपूर शहरातील आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील तसमिया अतिक मुल्ला, अस्मिया अतिक मुल्ला व आकाश लोखंडे यांनी एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहे.


मार्च 2021 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये झालेल्या एमएस-सिआयटी परीक्षेमध्ये यश संपादन केल्या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे यांनी त्यांचा सत्कार केला.


या पूर्वी ही आयआयटी कॉम्पुटर सेंटर मधील एकूण 18 विद्यार्थी 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे यांचे मार्गदर्शन लाभले.

गेल्या 21 वर्षांपासून पंढरपूर शहरामध्ये आयआयटी कॉम्पुटर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. प्रत्येक वर्षी कॉम्पुटर सेंटर मधील चांगले प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी इंजिनियर, डॉ, वकील, पीएसआय, तहसीलदार होऊन समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!