पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना साथीबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाचा शुभारंभ तुंगत येथे करण्यात आला.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जबादारीची जाणीव निर्माण व्हावी, आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, तुंगत ता.पंढरपूर येथे करण्यात .
आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ उपचार करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, सरपंच अंतनराव रणदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री .पिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, ग्रामपंचायत सदस्य , आरोग्य अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर उपस्थित होते.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य पथके तयार करण्यात आली असून, गावांतील 50 कुटुंबांची आरोग्य तपासणी व आरोग्याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.