‘माय रिस्पाँसिबिलीटी’ लघुपट युटुब चॅनेलवर

आमदार राजाभाऊ राऊत यांचे हस्ते झाला प्रदर्शित

बार्शी : ईगल आय मीडिया

अनिकेत फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी कोरोना विषयावर आधारित माय रिस्पाँसिबीलीटी या लघुपटाचे प्रर्दशन आमदार राजाभाऊ राऊत यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी सर्व जनतेने जबाबदारी समजुन घेऊन पाऊल टाकणे गरजेचे आहे, सद्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये बरेच लोक दगावले तर आहेतच परंतु काहीजन त्या मार्गावर देखील आहेत. त्‍यामुळे लोकांनी स्वतःची तर काळजी घ्यायला पाहीजेच, परंतु कुटुंबाची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे हा महत्वाचा संदेश यामधुन दिग्दर्शक महादेव जाधवर आणि सर्व कलाकार यांनी दिला आहे, तो अनमोल आहे असे म्हणून आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्व टिमचा सन्मान केला.


आज प्रत्येक व्यक्तिने काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण यापुढे कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना सुदधा धोकादायक आहे. जे गमावलं ते गमावलं, पण आहे ते सांभाळणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश यातील कलाकार महादेव जाधवर, अबोली पालके, संजना जाधवर, अतिश पालके, तसेच बालकलाकार अभिरा पालके, अनिकेत जाधवर या कलाकारांनी त्यांचे अप्रतिम अभिनयातुन दिला आहे. यामध्ये संगीत भुषण देवकर यांनी दिले.


याप्रसंगी विजय नाना राऊत, संजय राऊत, रवी राऊत, दशरथ मोहिते, दिलीप खटोड, सचिन उकीरडे, ऋषी मुलगे, डॉ. हरिष कुलकर्णी, आप्पा करळे, तुकाराम माने, नगरसेवक संदेश काकडे, आबा मुळे, सतिश दळवी, कांतीलाल मर्दा, बन्नी शिंदे, बापु करळे, दिपक मुंडे, शितल नाळे, डॉ.थोरबोले, समाधान पाटील, चोधरी सर, दत्तात्रय सावंत, आप्पा थोरात, सौरभ थोरात, सौदागर नवगीरे, कोरेकर सर, आप्पा कांदे , ओम शिंदे, पिंटू खराडे, गोटू वैद्य, हनमंत रणझुंजारे, खळदकर सर, संतोष उमाटे अशा अनेक मान्यवरांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!