पंढरपूर : ईगल आय मीडिया
आम.रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश शंकर जाधव यांची निवड केल्याचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष योगेश पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी बोलताना नागेश जाधव म्हणाले की,आम.रोहितदादांचे विचार समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तसेच युवकांचे प्रश्न,सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी या शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसंघटक सचिन आदमिले, सुरज भोसले, पिंटू मांडवे, निलेश कदम उपस्थित होते.