पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( NEP)2020 या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन फेसबुक लाईव्ह वरती करण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे (प्राथमिक ) जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी दिली.
गेल्या अनेक दशकापासून प्रथमच 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात आला आहे. त्याविषयी शिक्षक व पालकांना मार्गदर्शन व माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ( प्राथमिक ) वतीने आमदार संजय केळकर व राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली फेसबुक लाइव्ह चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
यामध्ये 15 आॕगस्ट रोजी शिक्षण तज्ज्ञ प्राची साठे ,16 आॕगस्ट प्रा.मंदार भानुसे वा 17 आॕगस्ट रोजी डाॕ.बालाजी चिरडे मार्गदर्शन करणार आहेत.चर्चासत्र हे सायंकाळी 4 ते 5 यावेळेमध्ये होणार आहे. शिक्षक व पालक यांनी मोठ्या संखेने या चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.