राष्ट्रीय पातळीवरील ऑलिंपियाड परिक्षेमध्ये एस. पी. पब्लिक स्कूलला 17 सुवर्ण

एस. पी. पब्लिक स्कुलचा  राष्ट्रीय पातळीवरील ऑलिम्पियाड स्पर्धेतील विजयी यशस्वी विद्यार्थ्यांचा संघ 

पंढरपूर : eagle eye new
ई.एच.एफ फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धेमध्ये नांदोरे ( ता. पंढरपूर येथील ) एस.पी. पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी 17 सुवर्ण, एक रौप्य  व एक ब्रांझपदक मिळवून घवघवीत यश संपादन केले.

प्रशालेच्या अनिरुद्ध गायकवाड, अथर्व गायकवाड, वेदांत वलगे, विनीत शिंदे, संचिता फाळके, श्रेया काटकर ,राजवर्धन भोसले ,आर्यन गादिया, अनुज देशपांडे ,अमरजा ननवरे, प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांनी  या स्पर्धेत  सुवर्ण व  मनस्वी खळगे या विद्यार्थिनीने सिल्वर पदक मिळवून यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे ,प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांनी केले.  यशस्वी विद्यार्थ्यांना कादर मुलाणी, अमरनाथ इंगोले, शहाजी साठे, रामचंद्र सावंत, अमोल तेली,सिमा पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

error: Content is protected !!