राष्ट्रवादी पदवीधर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सुग्रीव कोळी कायम

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी पदवीधर काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सुग्रीव कोळी यांची निवड कायम असुन यामध्ये कोणताही बदल नाही, त्यामुळे त्यांना पदमुक्त केले नसल्याचे पञ जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि कार्याध्यक्ष ऊमेश पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक तसेच काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जिल्हाध्यक्ष बदलीबाबत अफवा पसरवत आहेत असं पक्षाचं म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षापासुन विद्यमान जिल्हाध्यक्ष ऊत्तम काम करत असून त्यांना बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे प्रसिद्धीपञकात म्हटले आहे. तरी याची नोंद सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!