पंढरपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा उपक्रम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर पंढरपूर येथे वृक्षारोपण संपन्न झाल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष राकेश साळुंखे यांनी दिली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भविष्यात असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहू,आणि कर्मवीर भाऊरावांच्या विचाराने गोर गरीब विद्यार्थ्यांनच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचा न्याय व हक्कासाठी ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कायम कटिबध्द राहील हा निर्धार केला.
या कार्यक्रमाला प्रा. राक्षे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष राकेश साळुंखे,
जिल्हा कार्याध्यक्ष सुजित गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सौरभ ऐवळे, पंढरपूर शहर अध्यक्ष संकेत घोघरदरे, शहर कार्याध्यक्ष अमृता शेळके, शहर सचिव ओंकार जगताप, शुभम साळुंखे,जयदीप माने,
विशाल पवार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित!