पंढरीत जिल्हा राष्ट्रवादी युवती कार्यकारिणी बैठक संपन्न

राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून आ.पडळकर यांचा निषेध

पंढरपूर : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी युवती सोलापूर जिल्हा ग्रामीण ची कार्यकारणी बैठक आज पंढरपूर येथे संपन्न झाली. सोलापूर युवती जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले यांनी आयोजित केलेल्या या कार्यकारणी बैठकी साठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवती उपस्थित होत्या. युवती प्रदेश सचिव स्मिताताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ.प्राणिताताई भालके यांच्या उपस्थितीत आज (दि.03 जुलै रोजी) बैठक संपन्न झाली.


यावेळी जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील युवती तालुका अध्यक्ष , शहर तालुका अध्यक्षांच्या निवडी करून स्मिताताई देशमुख व प्राणिताताई भालके यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.व गोपीचंद पडळकर यांनी आदरणीय शरद पवार यांच्या विरुद्ध केलेल्या वक्ततव्याचा निषेध करण्यात आला.


‌सुमैया तांबोळी (जिल्हासचिव), नम्रता पाटील (जिल्हा सरचिटणीस), प्रज्ञा कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), किर्ती पालवे पाटील (माळशिरस तालुका अध्यक्ष)अंकिता शिंदे (सांगोला तालुका अध्यक्ष), प्राजक्ता पाटील (सांगोला शहर अध्यक्ष),शीतल क्षीरसागर (करमाळा तालुका अध्यक्ष), स्नेहल अवचर (करमाळा तालुका कार्याध्यक्ष), रविना भालशंकर (बार्शी तालुका अध्यक्ष), अमृता सावळे (बार्शी शहर अध्यक्ष), शीतल लोंढे (माढा तालुका अध्यक्ष), ऋतुजा सुर्वे (मोडनिंब शहर अध्यक्ष), मायाक्का थोरबोले (मंगळवेढा तालुका अध्यक्ष),अर्चना पुजारी(मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष),ऋतुजा चव्हाण (पंढरपूर तालुकाउपाध्यक्ष), श्वेता देशपांडे (पंढरपूर शहर सचिव)
‌यांच्या निवडी करून नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी,सारिका गायकवाड व इतर युवती पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

error: Content is protected !!