गंगाई सपाटे प्रशालेचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

टीम : ईगल आय मीडिया


तारापूर ( पंढरपूर ) येथील गंगाई सपाटे प्रशालेेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष-2020-21 इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी घेतल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्रशालेतील कु.मयुरी सुखदेव कोष्टी, कु.पायल मुकंदर मुलाणी आणि कु.अपूर्वा अण्णासाहेब सातपुते या विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.

कु.मयुरी कोष्टी हिने विशेष मागास प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेस एकूण 4 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 3 विद्यार्थ्यांनीनी यश संपादन केले. या तीनही विद्यार्थ्यांनीना इयत्ता-9वी ते 12वी पुढील 4 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी 12 हजार याप्रमाणे 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेतर्फे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील मिस्किन नितीन अशोक, ननवरे परमेश्वर उत्तरेश्वर, भुई शिवा गुलचंद, कसबे सिद्धेश्वर बबन, सौ.संध्या कदम, बामणे मल्लिकार्जुन राच्चप्पा इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


शिष्यवृत्तीधारक सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे,संस्था अध्यक्ष मा.मनोहर सपाटे, मुख्याध्यापक श्री .महंमद शेख, तसेच स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ,शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ , पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

error: Content is protected !!