राज्यात पुन्हा 8 हजार 700 रुग्ण सापडले

टीम ; ईगल आय मीडिया

काल ( दि.25 फेब्रुवारी रोजी) राज्यात दिवसभरात तब्बल ८ हजार ७०२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ८ हजार ८०७ इतकी होती. तर, आज ३ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील करोना  बाधित रुग्णांची झपाट्याने होणारी वाढ कायम असून आज दिवसभरातील रुग्णवाढीचा आकडा केवळ १०५ ने कमी आहे.

या बरोबरच राज्यात दिवसाला मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत कालच्या तुलेनेत घट झाली आहे. आज राज्यात एकूण ५६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८० इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४४ टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख १२ हजार ३६७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४९ टक्के इतके झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!