टीम : ईगल आय मीडिया
राज्यातील कोरोनाच्या विळख्यात ठाकरे सरकार मधील आणखी एक मंत्री अडकले आहेत. सोमवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ट्विटर वर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसात कोरोना बाधित झालेल्या गायकवाड या ठाकरे सरकार मधील 4 थ्या मंत्री आहेत. 18 सप्टेंबर रोजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, 19 रोजी राज्यमंत्री बच्चू कडू हे पॉझिटिव्ह आले आहेत.
यापूर्वी ठाकरे सरकार मधील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंढे हे मंत्री कोरोना बाधित झाले होते. आणि सध्या पूर्णपणे बरे होऊन ते कामकाज करीत आहेत. त्यात आता मागील 5 दिवसात 4थ्या मंत्र्यांची भर पडली आहे.