पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका : काळे गटाच्या बैठका सुरु

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात होवू घातलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भुमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली. गटनिहाय 72 ग्रामपंचायतीच्या बैठका घेणार असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.कल्याणराव काळे यांनी सांगीतले. 

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये शक्यतो विट्ठल परिवार अखंडीत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर आघाडी  करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.शेवटी गावाच्या विकासाचे ध्येय धोरण ठरवुन काम करणारे कार्यकर्ते सत्तेत असणे महत्वाचे आहे. त्यामुळे कार्य कर्त्यांची मते घेण्यासाठी बैठका  सुरु आहेत.
कल्याणराव काळे  , चेेअरमन ,स.शि. व.सा. कारखाना

पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय राजकारणापेक्षा गटा तटावरच होतात. तालुक्यात काळे, भालके, परिचारक हे तीन गट सक्षम असून,त्यांच्यामध्ये होणाऱ्या आघाडी वरुनच निवडणुकांचे भवितव्य ठरणारे आहे.

कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील केसकरवाडी,भाळवणी,धोंडेवाडी,जौनवाडी,उपरी,शेंडगेवाडी,पिराचीकुरोली,पळशी,सुपली,वाडीकुरोली,देवडे,पटवर्धनकुरोली,गादेगांव,शेळवे,वाखरी,शिरढोण,कौठाळी,खेडभाळवणी,भंडीशेगांव,सोनके,बोहाळी,उंबरगांव,तिसंगी या गावातील काळे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी गावनिहाय चर्चा करुन काळे यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकांमध्ये गावपातळीवरील स्थानिक मतभेद बाजूला ठेवून,एकत्रित काम करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

Leave a Reply

error: Content is protected !!