दार उघड उद्धवा दार उघड !

विठ्ठल मंदिरासमोर भाजपचे ‘घंटानाद आंदोलन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भाजपाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मंदिरासमोर घंटा नाद आंदोलन करण्यात आले.
पंढरपूर येथे जिल्हाअध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदिरा समोर नामदेव पायरी येथे भाजपाच्या वतीने सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे कडक नियमावली लागू करून तात्काळ उघडाण्यासाठी घंटानाद आंदोलन केले.

सध्याच्या परिस्थितीला लोकांना रोजीरोटी देणार्‍या प्रत्येक क्षेत्राची बंद राहण्याची क्षमता संपलेली आहे. प्रार्थनास्थळांवर ही अनेक कुटुंबांचे जीवन निर्भर आहे, त्यांची ओढाताण आता थांबायला हवी.
५ महिन्यांपासूनच्या या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडायला आध्यात्मिक आधाराची नितांत गरज आहे. तसेच वारकरी विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दिवसाची सुरूवात आनंददायी होते. त्यामुळे राज्य सरकारने कडक नियमावली लागू करून सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे सुरू करावीत अशी मागणी यावेळी श्रीकांत देशमुख यांनी केली.
या वेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

त्याबरोबर त्याचबरोबर पंढरपूर चे सर्व नगरसेवक, जोगदंड माहाराज दिंडी, कोळी समाज बांधव, ट्रस्ट व नामदेव पायरी व्यापारी बंधू शहर व तालुका महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!