पंढरपूर येथील मागासवर्गीय वसतिगृहासाठी निधी द्या

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या करीत असलेल्या वसतिगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी रिपाई चे नेते दीपक चंदनशिवे यांनी केंद्रीय समाजकल्यान राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिले आहे. यावेळी रिपाइंचे जेष्ठ नेते सुनील सर्वगोड उपस्थित होते.

येथील सामजकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या विद्यार्थी विद्यार्थासाठी शासकीय वस्तीगृह इमारत ही भाडेतत्वावर निवासी राहण्यासाठी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षा पासून हे वसतिगृह भाडे करार संपल्यावर इतरत्र हालवावे लागत आहे. ते एकाच ठिकाणी व्हावे यासाठी लागणारा ५ कोटी मंजूर करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांची होणारी ससेहोलपट थांबवावी अशी मागणी चंदनशिवे यांनी केली आहे.

त्याचबरोबर तालुक्याती अतिवृष्टी मुळे ग्रामीण भागातील दळवळणासाठी रस्तावरील ओढ्या नाल्यावर असण्यार्या अरुंद पुल सिडी वर्क यांच्या उंची कमी असल्यामुळे पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा तर होतच परंतु पुराच्या पाण्याने पिक वाया जाते. त्यासाठी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलाव सांडवा ते कौठाळी प्रर्यत किमान ५० कि.मी अंतरामधील सर्वच रस्त्यावरी पुलाची उची ८ ते १० फुटानी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ना आठवले यानी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे अशा अशयाचे निवेदनही देण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!