यमाई ट्रॅकवर वृक्षारोपण, ट्री गार्ड बसवले.
पंढरपूर : ईगल आय मीडिया
लायन्स आणि लायनेस क्लब पंढरपूरतर्फे आज स्वतंत्र भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन लायन्स क्लब संचलित शहिद कुणालगीर गोसावी अंधशाळेमधे लायन्स आणि लायनेस क्लब पंढरपूर यांच्या कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत व कृषी पर्यवेक्षक श्री.विवेक तांबोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सोशल डिस्टनसिंग पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स आणि लायनेस क्लब पंढरपूरने ,पंढरपूरचे आकर्षण ठरलेल्या यमाई तलावाभोवती जो अविकसित ट्रॅक आहे त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले.
पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाड व मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांच्या शुभहस्ते या वृक्षारोपणाचा आरंभ करण्यात आला.
याच ठिकाणी मा.श्री.बालाजी पूदलवाड यांच्या जन्मदिना निमित्त त्यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच लायन्स क्लब निर्मित ऑक्सिजन पार्कची उत्कृष्ट देखभाल करणाऱ्या श्री.दशरथ यादव यांचाही सन्मान करण्यात आला.
ट्रीगार्डस सहित वृक्षारोपण करण्यात आले.
ला.डॉ. सुजाता गुंडेवार, ला.ललिता कोळवले, ला.डॉ. संध्या गावडे, ला.डॉ.ऋजुता उत्पात, ला.राजेंद्र गुप्ता, ला.सीमा नलबिलवार, ला.डॉ.मनोज भायगुडे, ला.रेणुका घोडके यांनी ट्री गार्डस स्पॉन्सर केले होते.
कार्यक्रमासाठी ला.डॉ. विवेक गुंडेवार ला.रा.पां. कटेकर ला.मुन्नागिर गोसावी ला. डॉ.सुजाता गुंडेवार,ला.डॉ.पल्लवी माने,ला.जयश्री येलपले,ला.वर्षा कोळवले,लाय.प्रतिक्षा येलपले,लाय.निकिता पवार,लाय.माधुरी जाधव,उपस्थित होते.
सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले तर आभार ला.डॉ. पल्लवी माने यांनी व्यक्त केले.