पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना महामारीचे संक्रमण वाढत चालले असताना महाराष्ट्रातील जनतेचा अतिशय प्रिय असणाऱ्या गणेशउत्सवावर मर्यादा आल्या आहेत.असे असताना मराठी माणसाचा हा सण पुर्वीच्या जोमाने परंतु कोरोनाचे नियम पाळून साजरा व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली असून श्रीगणपती बाप्पाची मुर्ती मोफत देण्याची व्यवस्था मनसेच्यावतीने करण्यात आली असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप.धोत्रे यांनी सांगितले.
गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे नागरीक विविध समस्या व त्रासाला तोंड देत आहेत.कोरोनाचे संकट रोखण्यासाठी शासनाने अनेक निर्बध घातले असून अनेक दिवस लॉकडाउन पाळण्यात आले.या काळात अनेक उदयोग,व्यवसाय,कारखाने बंद पडले त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची रोजी रोटी बंद पडली या सर्वांच्या मदतीला धावून येत मनसेने पंढरपूर परिसरातील समाजाच्या सर्व स्तरातील जनतेला जिवनावश्यक वस्तुंची मोठी मदत केली होती.आता मराठी माणसाचा मानबिंदु असलेला गणेशउत्सव सण साजरा करताना कोणतिही अडचण येवु नये, म्हणून मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गणेशउत्सवाला आधार देण्यासाठी मागेल त्याला गणेशमुर्ती विनामुल्य व घरपोच देण्याचा निर्णय घेतला.यामुळे लॉकडाउन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या गणेश भक्तांना मोठा आधार मिळणार आहे.तसेच गणेश मुर्ती बनविणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायाला देखिल हातभार लागणार आहे.
यावेळी शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड, दिलीप पाचंगे, महेश पवार, सागर घोडके, नागेश इंगोले, अर्जुन जाधव, नागेश कुलकर्णी, इत्यादी उपस्थित होते.
गेले पाच महीने सर्वसामान्य जनतेचा रोजगार बंद आहे.त्यासाठी त्यांनी जगण्यासाठी आवश्यक असणारी मदत देण्याचा प्रयत्न आम्ही मनसेच्या माध्यमातून केला.आता अडचणीत असलेल्या मराठी बांधवांना आनंद मिळावा आपले सण व परंपरा साजरा करता यावेत यासाठी गणेशभक्तांना श्रीच्या मुर्तीचे घरपोच दान करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.संकटात देखिल एकत्र येवून बाप्पाचा उत्सव साजरा करु व कोरोनामुक्तीसाठी बाप्पाला साकडे घालु अशी संकल्पना यामागे आहे.
– दिलीप धोत्रे