शिवसेनेच्यावतीने टांगा आणि रिक्षा चालकांना किराणा माल वाटप


पंढरपूर शहर शिवसेना उपप्रमुखाचा उपक्रम

पंढरपूर : ईगल आय मीडिया


शिवसेनेचे पंढरपूर शहर उपप्रमुख तानाजी मोरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंढरपूर शहरातील टांगा चालक आणि रिक्षा चालकांना अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप केले.


लॉकडाऊनची झळ सर्वसामान्य जनतेला बसणार नाही याची काळजी घ्या त्यांना मदत करा असे निर्देश शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले होते. या आदेशाचे पालन करण्यासाठी मोरे यांनी आपल्या वाढदिनाचे औचित्य साधून हा समाज उपयोगी कार्यक्रम राबविला.


पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे इथे भरणाऱ्या चार वाऱ्या अन रोज असणारी भाविकांची रेलचेल यावर घोडागाडी (टांगा) आणि रिक्षा चालकांची कमाई असते. मात्र गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांची होणारी उपासमार ओळखून मोरे यांनी या व्यावसायिकांना संसार उपयोगी साहित्य वाटप केले.


याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकीरण घोडके, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रविंद्र मुळे, माजी शहरप्रमुख संजय घोडके, संजय ननवरे, लंकेश बुरांडे, विनायक वनारे, गणेश घोडके, पिंटू गायकवाड, दादा थिटे, संतोष बंडगर, सुरज गगथडे, सचिन साळुंके, प्रदीप कारंडे, प्रथमेश राऊत, निलेश गगथडे, सोपान देशमुख, बापू चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!