छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उपक्रम
पंढरपूर : ईगल आय मीडिया
न्यु दत्त तरूण मंडळ बडवेचर या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त कोराना काळात ज्यांनी उत्स्फूर्त पणे कामे केलेली होती. यामध्ये डाॅक्टर, पोलीस, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच समाजसेवक अशांना कोव्हीड योद्धा म्हणून मंडळा तर्फे प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, शहर पोलीस निरीक्षक अरूण पवार, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डाॅ.बजरंग धोत्रे हे उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब गुंड व रिपाइंचे शहराध्यक्ष संतोष पवार, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते कैलास गुंड, सुनिल बाबर, दत्ता चांडोले, अंबादास शिंदे, वैभव आलदर, सोमनाथ खंडागळे, वैभव चांडोले, सुनिल भोसले, दशरथ घळके, माऊली वाघमोडे, आकाश पुरी, संदीप चिकणे, आरिफ बागवान, विलास आवसरे इ.परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कृष्णा वाघमारे यांनी केले.