पंढरपूर तालुक्यात नवीन कोरोना रुग्ण पन्नाशीच्या आत !

पंढरपूर शहरात केवळ 8 रुग्ण सापडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या अडीच महिन्यापासून कोरोनाचा मुकाबला करीत असलेल्या पंढरपूर तालुक्याची आता कोरोनाच्या विळख्यातून सुटका होत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत केलेल्या चाचण्यांचे अहवाल आज जाहिर करण्यात आले आहेत. त्यानुसार पंढरपूर तालुक्यात केवळ 41 नवे रुग्ण सापडले आहेत. पंढरपूर शहरात केवळ 8 तर ग्रामीण भागात 33 नवे रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात केवळ करकम्ब येथिल एक 75 वर्षीय रुग्ण मयत झालेला आहे.

मागील महिन्यात दररोज 400 ते 500 रुग्ण पंढरपूर तालुक्यात सापडत होते या पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यातील कोरोनाचे प्रमाण खूपच खाली आले असून नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच प्रशासनाने ही आता उसंत घेतली आहे. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन तयारी करीत असल्याचे ही दिसून येते.

Leave a Reply

error: Content is protected !!