हाथरस, बलरामपूर अत्याचार निषेधार्थ पंढरीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन

अमित शहाना पोस्टाने पाठवल्या बांगड्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथील तरुणीवरील सामूहिक बलात्कार करून तिच्यावर घृणास्पद अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ पंढरीत जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी चौकात बांगडी आंदोलन केले. यावेळी अमित शहा यांच्या प्रतिमेस बांगड्या घालण्यात आल्या. तसेच पोस्टाने बांगड्या पाठवण्यात आल्या. राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशअध्यक्षा साक्षणाताई सलगर यांच्या सूचनेनुसार आंदोलन करून निषेध करण्यात आला. तसेच बांगड्या पोस्टाने भेट देण्यात आल्या.

त्यावेळी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस श्रिया भोसले, , सौ.किर्ती मोरे ( पंढरपूर युवती पंढरपूर तालुका अध्यक्ष), चारुशीला कुलकर्णी (प्रदेश संघटक), डॉ.अमृता मेनकुदळे (पंढरपूर शहर अध्यक्ष), सुधीर भोसले ( पंढरपूर शहर अध्यक्ष), सौ.साधना राऊत (ओ.बी.सी. महिला जिल्हाअध्यक्ष), सौ.अनिता पवार (पंढरपूर महिला तालुका अध्यक्ष), सौ.संगीता माने (पंढरपूर शहर अध्यक्ष), सचिन कदम (पंढरपूर शहर उपाध्यक्ष), कपिल कदम ( पंढरपूर शहर सहसचिव), शुभम साळुंखे ( उपाध्यक्ष,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस), ओंकार जगताप (उपाध्यक्ष ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ) सौ.सारिका गायकवाड, कु.हर्षाली परचंडराव, कु.गायत्री सावंत, कु.राधा मलपे, कु.योगिता मस्के, कु.शीतल शिरगिरे, कु.भक्ती शिंगटे, कु.ऐश्वर्या शिंगटे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!