रिपाइंच्या 63 व्या वर्धापनदिनी 64 जणांचे रक्तदान

पंढरपूर शहर रिपाईच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) च्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 64 जणांनी रक्तदान केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी संपन्न या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते झाले.


तसेच यावेेळी पधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमणे करण्यात आली.
सचिन गाडे यांची शहर कार्याध्यक्ष, अजिंक्य ओव्हाळ यांची शहर सचिव तर सचिन भोरकडे यांची पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कसबे, रिपाइंचे जेष्ठ नेते जितेंद्र बनसोडे, संतोष सर्वगोड , समाधान लोखंडे, सचिन गाडे, विजय वाघमारे, संघराज इंगळे , पोपट क्षिरसागर, महादेवसाहेब, अजिंक्य ओहाळ, सचिन भोरकडे, विक्रम पवार व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक रिपाईचे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष पवार हे होते.

Leave a Reply

error: Content is protected !!