पुणे : ईगल आय मीडिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार एका गरीब घरातील गुणवन्त विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. त्यांनी त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत केली आहे.
अनंत डोईफोडे ( रा.वडगर ता. वेल्हे, जि. पुणे ) या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ८२.८०% मार्क घेतले. अनंतच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे 11 वी चा प्रवेश आणि शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या या हलाकीच्या परिस्थितीची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाचनात आली. त्यावेळी पार्थ पवारांनी तत्काळ त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचे ठरवले, अनंत आणि त्याच्या वडिलांना पुण्यात घरी बोलावून घेवून त्याचे कौतुक केले. अनंतला कॉलेजला जाणे येण्यासाठी सायकल आणि अकरावीची सर्व पुस्तके मदत म्हणून दिली.
पार्थ पवार यांच्या या मदतीमुळे अनंतचे पालक भारावून गेल्याचे दिसून आले.