आता पार्थ पवारांची पूरग्रस्तांना आली मदत

पंढरपूर तालुक्यात 3 गावातील बाधितांना महिन्याचे साहित्य देणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता अनेकांचे हात पुढे येऊ लागले आहेत.तालुक्यातील सरकोली, ओझेवाडी आणि भोसे गावात आज पार्थ दादा पवार फाउंडेशन पुणेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली जाणार आहे.

तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापूर तसेच घाटाच्या भिंतीची दुर्घटना याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने पाहणी साठी आले आणि शासकीय यंत्रणा कामाला लावलेली असतानाच कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर शहर आणि काही गावात जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवून दिली.


आज भोसे तालुका पंढरपूर येथील जमदाडे वस्तीवरील पूरग्रस्त कुटुंबांना युवा नेते अॅड गणेशदादा राजुबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थ दादा पवार फाउंडेशन यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूची मदत राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले . त्यावेळी उपस्थित पूरग्रस्त कुटुंबीय ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष श्री करण कोकणे, जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, युवा नेते आशिष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात माळी ,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष सुजित गायकवाड ,पंढरपूर मंगळवेढा मतदार संघ विद्यार्थी कार्याध्यक्ष राकेश साळुंखे, सरपंच प्रतिनिधी रघुनाथ कोरके, सुनील तळेकर, धनंजय तळेकर, कृषी सहाय्यक धनराज खोत, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय भुजबळ ,बापू काकडे ग्रामस्थ उपस्थित होते

त्या पाठोपाठ आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून ही तालुक्यातील 3 गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली जाणार असून आज ( मंगळवारी ) या मदतीचे वाटप होणार आहे. तालुक्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सरकोली, ओझेवाडी आणि भोसे गावात ही मदत दिली जाणार असल्याचे पार्थ पवार युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले.

पवार कुटुंबाचे पंढरपूर तालुक्याकडे नेहमीच लक्ष असते. यावेळी नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सुद्धा पवार कुटुंब पुढे आल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!