सांगोला : ईगल मीडिया
पुण्याहून आलेली ती महिला लॉकडाऊन मुळे माहेरीच अडकली. महिना उलटून गेला. ती महिला मनोरुग्ण असल्याने नेहमी घेत असलेल्या गोळ्याही संपल्या. त्यातच भावाबरोबर किरकोळ भांडण झाले. आणि रागाच्या भरात रात्रीच्या अंधारात तिने पुण्याची वाट धरली. सगळीकडे लॉकडाऊन मुळे सन्नाटा असतानाच ह्या महिलेचा एका निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास सुरु झाला. घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील सोनंद ते हतीद दरम्यानच्या निर्जंन व जंगल सदृश्य रस्त्यावर जिल्हा पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना ह्या महिलेला त्यांनी पहिले. आणि नातेवाईकांशी सम्पर्क साधून त्यांच्या ताब्यात सुरक्षित दिले.
२० एप्रिलचा रात्री १० वाजताच आहे. पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकाला सोनंद हतीद दरम्यानच्या निर्मनुष्य रस्त्यावर अंधारातून रस्त्याच्या एका बाजूने हि महिला एकटीच जाताना दिसली. गाडी थांबवून पोलिसांनी चोकशी केली असता ती घेरडी (ता. सांगोला) गावाची असल्याचे समजले. भावाबरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात ती तिच्या पतीकडे पाषाण, जिल्हा पुणे येथे चालत निघाल्याची माहिती समजली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक देवरे यांनी ह्या महिलेला सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्या महिलेकडून तिच्या पतीचा मोबाईल नंबर घेऊन पोलिसांनी त्याला संपर्क साधला. तिच्या पतीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. लॉकडाऊन सुरु होण्यापूवी ती महिला माहेरी भावाकडॆ गेली होती. नंतर वाहने बंद झाल्याने ती तिथेच अडकली. किरकोळ कारणावरून कुरबुरी झाल्याने ती एकटीच रात्रीच्या वेळी पुण्याकडे चालत निघाली अशी माहिती तिच्या पतीने दिली. ती महिला मनोरुग्ण असून तिच्या नेहमी घेत असलेल्या गोळ्या देखील संपलेल्या आहेत, अशी माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. सर्व सविस्तर चोकशी केल्यानंतर पो. नि. देवरे यांनी सांगोला पोलिसांच्या मदतीने तिच्या भावाला बोलावून घेऊन त्याच्या ताब्यात सुखरूप दिले.
कोरोनो वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. जिल्हाबंदी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणी प्रवेश करू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. गस्त वाढवल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी एक पथक तयार केले आहे. पंढरपूर व सांगोला तालुक्याच्या तपासणीसाठी पो.नि राजेश देवरे, हवालदार अनंत मनसुळे ,सतीश सर्वगोड, अधिग्रहण वाहनाचे चालक एन. एन. गुंड, यांचा ह्या पथकात सहभाग आहे. हे पथक जिल्ह्याच्या सर्व बॉर्डरवर चेक नाक्यावर कडक तपासणी करत आहे.
पो.नि राजेश देवरे यांच्या नेतृत्वाखालील ह्या पथकाच्या सतर्कतेमुळे, ह्या महिलेचे रक्षण झाले. व ती तिच्या माहेरी सुखरूप पोहचली. तिच्यासाठी पोलीस देवदूतासारखे धावून आले. पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुळे पो.नि.राजेश देवरे ,त्यांच्या पथकाचे व सांगोला पोलीस स्टेशनचे पो. नि. राजेश गवळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.