सर्वसामान्यांचे असामान्य नेतृत्व : प्रतापसिंह मोहिते – पाटील

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी, दमदार आणि दिमाखदार, धाडसी व्यक्तिमत्त्व कार्यकर्त्यांचे पप्पा साहेब उर्फ माजी मंत्री कै प्रतापसिंह मोहिते – पाटील यांचा आज स्मृतिदिन, त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा पत्रकार सुनील गजाकस यांनी आढावा

लोकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारा नेता लोकनेते कै. प्रतापसिंह मोहीते-पाटील म्हणजेच’ ”पप्पासाहेब ”यांच्या स्वभावातील सर्व सामान्य बदलची आपुलकी दिलदार पणा ,सामान्यासाठी समर्पित होणारी वृती हे स्वभावातील वैशिष्टये होते. वंचित दीन-दूबळयाचे ते कैवारी होते. पप्पासाहेबांची सामान्य कार्यकर्ता ते सहकार राज्यमंत्री आणी खासदार पर्यतची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे .

सन१९७५ मध्ये उपेक्षिताची सेवा करता यावी या करिता सहकार महर्षीनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेची धूरा आपल्या खांदयावर घेतली .सोलापूर जिल्हातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकत्यांची फळी उभी केली. सन१९८४ साली सोलापूर जिल्हा युवक कॅांग्रेस अध्यक्ष पदी स्वता:इंदिरा गांधी यांनी त्यांचे नेतुत्व आणि संघटन कौशल्य हेरून त्याची निवड केली. १९९२ ते १९९७ या कालावधीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना महाराष्ट्रात २८व्या क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद दुस-या क्रमांकावर आणली.

त्यांच्या कार्याची जिल्हाला व पक्षानी दखल घेवून १९९८ मध्ये त्याना भाजपकडून विधान परिषदेवर जाणयाची संधी चालून आली.युतीचे सरकार असताना सहकार राज्यमंत्री पदी काम पाहिले .सन २००३ मध्ये सोलापूर मतदार संघातून उभे राहून भाजपला दमदार विजय मिळवून दिला.व्यक्तिचे जिवन सर्वाथानी विकसित ,समृदध होण्यासाठी उत्तम शिक्षण दिले गेले पाहिजे या भागातील शेतक-याची मुल जर विदया ,कला,संस्कृती याद्वारे संपन्न होतील व त्यामुळे समाजविकास आपोआप होईल व ग्रामीण भागातील शेतकरी मजूर या ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर यांची स्थिती बदलेल प्रगती होवून सामान्याचे राहणीमान उंचावले पाहिजे या विचाराने तालुकयाच्या पश्चिम भागात गरीब व शेतक-यांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता यावे या करिता त्यानी नातेपुते या गावात सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील महाविदयाल्याची स्थापना केली .
पप्पासाहेबांच्या जाण्याने सामाजिक व राजकिय क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे .साहेबांच्या कार्याचा आणि विचाराचा आदर्श डोळयासमोर ठेवून मा.डाॅ धवलसिंह मोहिते-पाटील राजकीय व सामाजिक वाटचाल करित असल्याचे दिसते .साहेबांनी आयुष्य भर जोपासलेली आदर्श जीवनमुल्य सतत अनेकांना प्रेरणादायी ठरतील .काळ सरकतो तस दू:ख कमी होत नाही. पण पप्पासाहेबांचा आठव मात्र चिरंतन राहतो .आपल्या अपूर्व कामगीरीने एक कालखंड सुर्वण अक्षरानी अंकीत करून ठेवला .या दैवताला व त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

लेखक :- सुनिल गजाकस पत्रकार , नातेपुते

Leave a Reply

error: Content is protected !!