सरकोली येथील तुळजाभवानी मंदिराचा भूमिपूजन संपन्न
पंढरपूर : eagle eye news
सरकोली ( ता. पंढरपूर ) येथील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे भूमिपूजन शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. राजाभाऊ खरे यांनी श्री तुळजाभवानी मंदिर बांधकाम करण्याचे आश्वासन सरकोलीकरांना दिले होते. त्यामुळे दिलेला शब्द पाळल्यामुळे ग्रामस्थांनी राजाभाऊ खरे यांच्या हस्तेच भूमिपूजन केले.
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे श्री तुळजाभवानी मंदिर बांधकाम करण्याचे आश्वासन उद्योजक राजाभाऊ खरे यांनी सरकोलीकरांना दिले होते.
त्यासाठी दिला शब्द आणि केले भूमिपूजन असेच पहावयास मिळाले. यामुळे सरकोली येथील नागरिकांतून खरे यांच्याबद्दल मोठी आपुलकी वाढली आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाचे वेळी बोलताना खरे म्हणाले की,या सरकोली गावात ज्यावेळेस आलो, त्यावेळी श्री तुळजाभवानी मंदीरास निधी देऊन सभामंडप बांधणार असल्याचे वचन दिले होते. त्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच यापुढे देखील मी या जनतेसाठी काम करत राहणार आहे असल्याचे आश्वासन दिले.
उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या स्वखर्चातून या कामास गती देत श्री तुळजाभवानी मंदीराच्या बांधकामाचे भूमिपूजन उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या तरी मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी अशी संकल्पना राबवित आणि दिलेले वचन पाळणारा नेता म्हणून राजाभाऊ खरे यांचे नाव अवघ्या मतदार संघात परिचित झाले आहे. सर्वसामान्य जनतेतून मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून राजाभाऊ खरे यांचेसारखे नेतृत्व लाभले पाहिजे.असे गावागावातील सर्वसामान्य जनतेतून चर्चिले जात आहे.
या भूमिपूजन प्रसंगी जय मातोश्री पतसंस्थाचे चेअरमन रामहरी भोसले, कल्याण भोसले,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे, रंगनाथ गुरव, नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे, ज्योतीराम गोडसे, संजय मस्के,समाधान बाबर,नवनाथ आसबे, चिंतामणी भोसले, राज दिघे,विनायक भोसले,संभाजी पवार,नागेश भोसले, अंबादास पवार, सिद्धेश्वर माने, ऋषिकेश दिघे,भाऊ शिंदे, सिद्धेश्वर लोखंडे-पाटील, मच्छिंद्र मोटे, आदी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.