उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) गोरख शेलार यांनी डिसले गुरुजींचे अभिनंदन केले
सोलापूर : ईगल आय मीडिया
युनोस्को – वार्की फाऊंडेशनचा 7 कोटींचा ग्लोबल टिचर पुरस्कार जाहिर झाल्याने बार्शीचे सुपुत्र रणजीत डिसले यांनी देशाचे नाव उंचावले आहे. या गुरुजींचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे मत श्री.गोरख शेलार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) यांनी व्यक्त केले.
परितेवाडी ( जि.सोलापूर ) येथील शिक्षक रणजीत डिसले यांना युनोस्को वार्की फाऊंडेशनचा 7 कोटींचा ग्लोबल टिचर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केल्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षमधील यावेळी सचिन सोनवणे डॉ.ए.सी. मुजावर यांची उपस्थिती होती.