पंढरपूर : ईगल आय मीडिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तुंगत (तालुका पंढरपूर ) येथील नम्रता रामेश्वर पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मान्यतेने नम्रता पपाटील यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले यांनी दिली. निवडीचे पत्र श्रीया भोसले यांच्या हस्ते देण्यात आले .
याप्रसंगी राष्ट्रवादीचे पंढरपूर शहर अध्यक्ष सुधीर भोसले, माढा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष नवनाथ रणदिवे, किरण भोसले ,अबोली रणदिवे, रामेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नम्रता पाटील यांनी बोलताना, समाजातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी पारदर्शक काम करेन महिला सबलीकरण व सक्षमीकरण तसेच मुलींच्या शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे सांगितले.