गोपाळपूर येथील अपघातात 1 जण ठार

दोन मोटारसायकल ची समोरा समोर धडक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गोपाळपूर ( ता.पंढरपूर ) येथे रांजनी रोडवर झालेल्या दोन मोटारसायकलच्या धडकेत एक युवक ठार झाला आहे तर दुसरा जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

गोपाळपूर – रांजनी रोडवर मंगळवारी रात्री दोन मोटारसायकल ची समोरा समोर धडक झाली. यामध्ये रामचंद्र बाळू राऊत ( वय 35, रा. भोसे, ता.पंढरपूर ) याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल स्वार जखमी झाला आहे.

या अपघातातील मोटार सायकल वेगाने एकमेकांना धडकल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर समोर जाऊन पडली. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने ट्रॅक्टर चा अपघात टळला. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!