दै सकाळ चे वितरण अधिकारी रजपूत यांचे कोरोना मुळे निधन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

दैनिक सकाळच्या पंढरपूर विभागामध्ये गेल्या 30 वर्षांपासून वितरण विभाग प्रमुख म्हणूम उदयसिंह रजपूत यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रजपूत यांच्या निधनानंतर पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली असून जुना सहकारी कोरोना मुळे अकाली गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

उदयसिंह रजपूत यांना कोरोना ची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे नेले त्यानंतर त्यांना पंढरपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले. मात्र उपचारा दरम्यान आज ( 15 रोजी ) पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

कोरोना सारख्या महामारीमुळे पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. आणि अकाली मृत्यू झाला यावरून कोरोना मुळे आरोग्य व्यवस्था किती तोकडी पडत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!