टीम : ईगल आय मीडिया
आमदार आशुतोष काळे यांनी आज ( मंगळवारी) समृद्धी महामार्गावरील जेऊर, कुंभारी व कोकमठाण परिसरात होणाऱ्या सर्कलमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव येथे बैठक घेतली.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व सदर अडचणी सोडवण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार श्री. कोतवाल, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक सचिन आव्हाड, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीप शिंदे, सुनील बोरा, वसंतराव आव्हाड, रामनाथ आव्हाड, विजय रोहोम, डॉ. यशराज महानुभाव, डॉ. ओंकार जोशी आदींसह बाधित शेतकरी उपस्थित होते.