पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर येथे सणगर समाजाने आयोजिलेल्या राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळ्यात गोरज मुहूर्तावर 11 जोडप्यांच्या रेश्मी गाठी बांधण्यात आल्या. संत तनपुरे महाराज मठात समाजाच्यावतीने हा 4 था सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.
मंगळवार दि. 14 फेब्रुवारी रोजी विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी 9 वाजात आलेल्या वर्हाडी मंडळींचे स्वागत करण्यात आले. यानंतर विवाह इच्छुक वधु-वरांचे विवाह नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. यानंतर ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपूरे यांच्या हस्ते विवाह सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी 12 वाजता समाजातील विवाह इच्छुकांचा वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला.यानंतर वधु-वरांची थाटामाटात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
सायं. 6:20 मि. या गोरज मुहूर्तावर 11 वधुवरांचा वैदीक पद्धतीने विवाह संपन्न झाला. वधू-वरांसाठी समाजावतीने हळदीचा, लग्नाचा संपूर्ण पोशाख, सौभाग्याचे लेणी मनी मंगळसूत्र, जोडवी, हळदीचे हार, लग्नाचे हार, तसेच प्रत्येक जोडप्यास प्रथम कन्या झाल्यास अठरा वर्षासाठी 31 हजाराची ठेव पावती देण्यात येणार आहे. यावेळी या नव वधूवरांचा शुभ आशिर्वाद देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी अखिल भारतीय सनगर समाज मठ ट्रस्ट अध्यक्ष सतिश रामचंद्र सादिगले यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सनगर समाज मंडळी चे अध्यक्ष उमेश नामदेव ढोबळे यांनी आभार मानले. या मेळाव्यात उपस्थित समाज बांधवांचे स्वागत स्वागताध्यक्ष कैलास कारंडे यांनी व आभार स्वागताध्यक्ष धनंजय कारंडे यांनी मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी समस्त दैव सनगर मंडळी पंढरपूरचे उपाध्यक्ष सचिन कारंडे, संजय खुळपे, शक्ती कारंडे, भारत कारंडे, दत्तात्रय लिमकर, दिलीप पालसांडे, देवेंद्र गोंजारी, सुनिल इकारे, दत्तात्रय कमले, शशिकांत कमले, ज्ञानेश्वर सादिगले, अंकुश राऊत, हरिभाऊ नडे, सुभाष कमले, संतोष खुळपे, पांडुरंग ढोबळे, राजेंद्र सादिगले, दगडु खुळपे, विठ्ठल कारंडे, लक्ष्मण कारंडे, दिलीप कमले, अॅड. मंगेश राऊत, अॅड. सदानंद कारंडे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.