सांगोला साखर कारखान्याकडून गुढीपाडवा सणासाठी ऊस आलेल्या शेतकऱ्यांना साखर वाटप


चालू हंगामातील 3 लाख टन ऊस गाळप पूर्ण


पंढरपूर : ईगल आय मीडिया


गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला सांगोला सहकारी कारखाना धाराशिव साखर कारखाना [युनिट४] कडे आल्याने सांगोला, पंढरपूर – मंगळवेढा, आणि माळशिरस तालुक्यातील ऊस आलेल्या शेतकऱ्यांना गुढीपाडवा सणासाठी साखर वाटप करण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. 


ज्या शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिला आहे. शेतकऱ्यांमुळे कारखाना यशस्वी गाळप करू शकला कारखाना दिवाळी नंतर चालू झाल्या मुळे दिवाळी गोड करता आली नव्हती त्यामुळे गुढीपाडवा सण गोड व्हावा म्हणून २५ रूपयाने २५किलो साखर वाटप करण्यात येणार आहे.

३ लाख यशस्वी गाळप पुर्ण केले आहे. कमी कालावधीत संचालक मंडळांनी उत्तम नियोजन करीत कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या कारखाना चालविला तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासन आणि  चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून भागातील ऊस संपेपर्यंत कारखाना चालू ठेऊ  असे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!