गादेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी शिंदे

तर व्हा. चेअरमनपदी सुधाकर बागल

फोटो ; गादेगाव सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. 

 पंढरपूर : eagle eye news
गादेगाव विकास सेवा सोसायटी नं.2 च्या चेअरमन पदी शिवाजी शिंदे यांची तर व्हा चेअरमनपदी सुधाकर शिंदे यांची निवड झाली आहे. नुकतीच सोसायटीची  पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.  या सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणुक बुधवार दिनांक 17 रोजी सहाय्यक निबंधक(सहकार) पंढरपूर यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस. महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली.

चेअरमनपदासाठी शिवाजी शिंदे यांची तर व्हा. चेअरमनपदासाठी  सुधाकर बागल यांचे एकेक अर्ज आल्याने त्यांची  बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

 यावेळी संस्थेचे संस्थापक तथा खरेदी विक्रि संघाचे चेअरमन शांतीनाथ बागल, माजी चेअरमन पांडुरंग  बागल,  शंकर  बागल, खरेदी विक्रि संघाचे संचालक नवनाथ पोरे, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक शशिकांत बागल, कुबेर बागल, अविनाश बागल, कांतीलाल बागल, संतोष बागल, किरण शेंडगे, अरुण कांबळे, बाळु कदम, दत्तात्रय कोळी, प्रियंका मोलाणे -भोसले, द्रोपदी नामदेव शेंडगे आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए.एस. महारनवर तर सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव शंकर कवडे यांनी कामकाज पाहीले.  बिनविरोध निवड झालेले चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सत्कार शांतीनाथ बागल , पांडुरंग बागल व  यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!