पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून पंढरपूर वासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून दिवस रात्र परिश्रम घेणाऱ्या पंढरपूर शहरातील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आज शिवक्रांती संघटनेच्यावतीने “कोरोना सुपर हिरोज” म्हणून सन्मान करण्यात आला.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. प्रदीप केचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी कोविड केअर सेंटर येथे सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोसले, निर्भया पथकाच्या श्रीमती. कुसुम क्षीरसागर, डॉ. संगीता भोसले, रॉबिन हूड आर्मी ग्रुप, सलग 100 दिवस गोर गरिबांना अन्नदान करणारे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, गरजुंना मोफत रिक्षा प्रवास घडवून आणणारा सामाजिक कार्यकर्ता श्री. विष्णू शेटे यांच्या सह इतर कार्यकर्त्यांचा शिवक्रांती संघटनेचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ काळे यांच्या हस्ते
सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवक्रांती संघटनेचे सल्लागार श्री.अजिंक्य शिंदे, शहर अध्यक्ष श्री. माऊली चव्हाण,शहर उपाध्यक्ष श्री. दादा शेटे, शहर संघटक श्री. मंगेश श्रीखंडे, प्रसिद्धी प्रमुख श्री रणजित सावंत, श्री. प्रशांत ठाकरे, श्री. रविंद्र गोरे, राजेश बामणी, औदुंबर महामुनी, कल्याण झेंड, माऊली निकते, निलेश माळवे, विकी काळे यांनी परिश्रम घेतले.