पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेकडून निषेध
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दि 22 जुलै रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘ जय भवानी जय शिवाजी ‘ अशी घोषणा दिली. यावेळी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे माझे हाऊस आहे, येथे असा प्रकार चालणार नाही , असे उदगार काढून छत्रपती शिवरायांप्रती अनादर व्यक्त केला आहे. या देशातील तमाम शिवप्रेमींच्या श्रद्धेस तडा देणारी असून सभापती नायडू यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करणारे निवदेन पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार वैशाली वाघमारे यांना देण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेली खोटी भावना उघड झाली आहे. या घटनेचा आता भाजपा निषेध करणार का असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे.
हे निवेदन देताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवी मुळे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, सचिन बंदपट्टे, विनय वणारे, पोपट सावंतराव, बाबा अभंगराव, अविनाश वाळके,समाधान अधटराव यांच्यासह काका बुराडे, सहदेव कांबळे, युवा सेना समनव्यक अमित गायकवाड, ईश्वर साळूंखे आदी उपस्थित होते.