श्री तुंगेश्वर हायस्कुलकडून पञकारांचा सन्मान


तुंगत : ईगल आय मीडिया

समाज प्रगतीसाठी पञकारांची भूमिका महत्वाची आहे. सर्वच स्तरातील लोकांच्या अडी अडचणी पञकारितेच्या माध्यमातून ते सोडवित असतात. त्यांच्या चांगल्या कार्याला पाठबळ देण्यासाठी श्री तुंगेश्वर हायस्कुलकडून तुंगत गावातील पञकारांचा श्रीफळ, फेटा, शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला.


श्री तुंगेश्वर हायस्कुल तुंगतचे माजी विद्यार्थी व दै. तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना नुकताच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली यांच्याकडून ‘समता गौरव पुरस्कार’ देण्यात आला. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संजय रणदिवे, विकास सरवळे यांचाही सन्मान करण्यात आला .


याप्रसंगी मुख्याध्यापिका रंजना पुकळे, दादा जमदाडे, एस.डी.रणदिवे, बिरुदेव बरकडे, दत्ताञय बनसोडे, लक्ष्मण अमंगे, एम.डी.पाटील, राजकुमार पाटील, आर.डी.वाघमारे, एम.एस. मेलगे, इ.शिक्षक व शिक्षकेतर सोनवणे पो.एस.अशोक गंगधरे आदीउपस्थित होते. प्रास्ताविक जेष्ट शिक्षक एस.डी.रणदिवे,सुञसंचालन लक्ष्मण अमंगे तर आभार दादा जमदाडे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!